DIRECTOR’S MESSAGE

सुजाण पालकांनो,
कडक इस्त्रीचा गणवेश, शूज, टाय, वजनदार दप्तर, स्कूलबस, पाठांतर, होमवर्क आणि भरमसाठ फी म्हणजेच मुलांचे शिक्षण असेच आपण समजतो. सर्व पालक सतत मुलांच्या शिक्षणाने ग्रासलेले दिसतात. बालपण विसरून आपली मुलंही सध्या अभ्यासानीच ग्रासलेली दिसतात. पण हे काही वास्तव नाही; याशिवायही मुलं उत्साहाने पानभर भराभरा लिहू शकतात. नानी एखाद्या विषयावर स्वतःचे विचार ठामपणे मांडू शकतात. यासाठी गरज आहे पालकांनी व शिक्षकांनी पठडीबद्ध शिक्षणाची झापडं बाजूला सारण्याची आणि शिक्षण या विषयाकडे अत्यंत डोळसपणे व आनंदाने पाहण्याची.
सबको पढाना है ही बिरुदावली घेऊन लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूलची मुहूर्तमेढ २००८ साली रोवल्या गेली. दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशीच भूमिका शाळेची राहिली आहे. म्हणूनच पाठ्यपुस्तकीय शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षण, जीवनोपयोगी शिक्षण अगदी हसत-खेळत दिले जाते.
अगदी छोट्या स्वरुपात भाड्याच्या खोल्यांमध्ये शाळा सुरु केली आणि शैक्षणिक दर्जाशी कुठलीही तडजोड न करता प्रवास सुरु ठेवला. आज आपणांस हे प्रामाणिकपणे नमूद करावे वाटते की, आपल्या वसमत शहरात शाळेची सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी इमारत उभी राहिली आहे. आणि हो यासासाठी आपली भक्कम साथ आम्हाला लाभली आहे.
सध्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. मला खात्री आहे की, आपण आपल्या इ. १ली ते १०वीच्या पाल्याचा प्रवेश आमच्या शाळेत नक्कीच घ्याल सोबतच शाळेची आजपर्यंतची उज्ज्वल कारकिर्द पाहता आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार व शेजाऱ्यांना या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आग्रही रहाल.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांना खुप साऱ्या शुभेच्छा!